दानापूर – पावसाळ्यात गावालगतच्या नदीला पहिला पूर आला की परंपरेप्रमाणे गावातील मुख्य व्यक्ती सपत्नीक नदीचे पूजन करून साडी-चोळी अर्पण
करीत असते. ही प्रथा आजही दानापूर गावात जपली जात आहे.तेल्हारा तालुक्यातील दानापूर गावालगतच्या वान नदीला यंदाचा पहिला पूर आल्याने रविवारी
सकाळी माजी सरपंच महादेव वानखडे यांनी पत्नीसमवेत नदीपूजन केले. साडी-चोळीची ओटी भरून आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पारंपरिक विधी पार
पाडला.या वेळी गावात सुख-शांती, बळीराजाच्या विहिरीत पाण्याची पातळी वाढावी आणि पुरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी सामूहिक प्रार्थना
करण्यात आली.महादेव वानखडे, माजी सरपंच दानापूर, यांनी सांगितले, “गावात समाधान लाभावे, संकटे दूर व्हावीत याकरिता आसरा मातेसह नदीला
साडी-चोळी अर्पण केली.”
Read also :https://ajinkyabharat.com/paturchaya-chimukalyani-sakarle-environmental-bappa-kids-pardijamadhyay/