पुराचे पाणी घुसले घरात; संसार उपयोगी साहित्याचे नुकसान

उपासमारीच्या छायेत आमटे कुटुंब

पिडीत कुटुंबाची शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

मनोरा – तालुक्यातील मौजे आसोला खुर्द येथे २९ ऑगस्ट रोजी

सकाळी मुसळधार पावसामुळे गावाच्या नाल्याला पूर आला.

या पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या मारोती बंडू आमटे यांच्या

घरात घुसल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.

पहाटेपासून दोन तास मुसळधार पावसाने थैमान घातल्याने घरातील अन्नधान्य,

कपडे तसेच दैनंदिन जीवनातील वस्तू पाण्यात वाहून गेल्या.

या घटनेनंतर पिडीत आमटे कुटुंबाने शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

पिडीतांचा आक्रोश

“मी भूमिहीन असून मजुरीचे काम करून कुटुंब चालवतो.

शुक्रवारी पुराचे पाणी घरात घुसल्याने घरातील अन्नधान्य व साहित्य वाहून गेले.

त्यामुळे माझ्या कुटुंबातील दोन लहान मूकबधीर मुले,

पत्नी व मी उपासमारीच्या स्थितीत आहोत,” अशी व्यथा मारोती आमटे यांनी व्यक्त केली.

या घटनेची पाहणी करून पंचनामा करण्याची व शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी,

अशी मागणी ग्रामस्थांनीही केली आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/patur-nagar-parishdeet-jyeshtha-clerk-syed-rasul-chand-yancha-service/