मुर्तिजापूर, प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सुनील गोपाळ उभे या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी,
अशी मागणी धनगर समाज संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
सोशल मीडियावरील या पोस्टमुळे समाजात तणाव निर्माण होण्याचा धोका असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांच्यासारख्या राष्ट्रनायिकेच्या शौर्यपूर्ण आणि सेवाभावी कार्याचा अवमान झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तीने हे कृत्य जाणूनबुजून द्वेष पसरवण्यासाठी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
धनगर समाज व युवक संघटना, मुर्तिजापूर यांच्या वतीने या संदर्भातील निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनावर धनगर समाज संघटना तालुका अध्यक्ष अभिषेक गाडवे, प्रा. एल. डी. सरोदे, निखिल गाडवे, रविंद्र माडकर,
अमर कोल्हे, सदाशिव डवंगे, गौरव डवंगे, वैभव काळे, अनील लाखे, आशीष कोल्हे, अक्षय भागवत,
शाम हेंगड, राजूभाऊ भागवत, राजूभाऊ जोगदंड (काँग्रेस तालुका अध्यक्ष), गजानन चव्हाण,
संजय राऊत, निलेश सरोदे, अंकुश सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी,
अशी ठाम मागणी करण्यात आली. अन्यथा समाजबांधवांमध्ये असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.