पुण्यात दुपारी मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर!

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून

मध्यरात्रीपासूनच ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदार

Related News

हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, सोलापूर,

सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, परभणीसह अनेक

जिल्ह्यात वरुणराजाचं आगमन झालं आहे. मात्र, या परतीच्या

पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून अनेक ठिकाणी

फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी खरीपची

पिकेही पाण्यात गेल्याचं चित्र आहे. पुणे शहरात अचानक दुपारी

आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दमछाक

झाली. पुणे शहरासह ग्रामीण भाग, त्याचबरोबर धरण क्षेत्रात

देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर, पुण्यातील

टिळक रस्त्यावर पाणी साचलं होतं, अनेक रस्त्यांवर पाणी

साचलेलं असून रस्त्यांवर स्लो ट्रॅफिक पाहायला मिळतंय.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस असाच

पाऊस पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात असणार आहे.

तसेच, राज्यातील विविध भागात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा

अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/president-of-ashutosh-gowarikar-international-film-festival/

Related News