पंजाबच्या मोगा शहरात धक्कादायक घटना —

पंजाबच्या मोगा शहरात धक्कादायक घटना

मोगा (पंजाब)

रविवारी दुपारी पंजाबच्या मोगा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

एका कॉस्मेटिक दुकानात एकटीच बसलेल्या महिलेला हिप्नोटाइझ करून अज्ञात लुटारूंनी लाखो रुपये किमतीच्या तीन

Related News

सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. ही संपूर्ण घटना दुकानामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हिप्नोटाइझ करून केली फसवणूक

महिला दुकानात एकटी बसलेली असताना, लुटेरे ग्राहक असल्याचा बहाणा करत दुकानात आले.

काही क्षणांतच त्यांनी महिलेला हिप्नोटाइझ केलं आणि तिच्या हातातील तीन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या.

लुटेरे अंगठ्या घेऊन काही मिनिटांतच घटनास्थळावरून पसार झाले.

भानावर येताच पोलीस ठाण्यात धाव

जेव्हा महिलेला भान आलं, तेव्हा तिने तात्काळ पोलिसांना कळवलं आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांची चौकशी सुरू

या प्रकरणाची गंभीर दखल घेत, तपास अधिकारी एएसआय हरजिंदर सिंग यांनी सांगितलं की,

“सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.”

Read Also : https://ajinkyabharat.com/agra-bjp-leaders/

Related News