अकोला – अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य रोग पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या भरीव आर्थिक मदतीसाठी आजाद फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आले.आंदोलनात तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी ‘पुंगी’ वाजवत आपला रोष व्यक्त केला आणि शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध नोंदवला.आजाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे तातडीने मागणी केली की, नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करण्यासाठी शासकीय पथक पाठवले जावे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला जावा. शेतकऱ्यांनी या रोगामुळे झालेल्या नुकसानीविरोधात त्वरित कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून लवकरच उत्तर येईल की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
read also :https://ajinkyabharat.com/navratri-pm-machacha-kadak-fast/
