पुण्यात बोरगाव मंजूचा तरुण बेपत्ता; दीड महिन्यांपासून कुठलाही संपर्क नाही, कुटुंबीयांची धास्ती

पुण्यात बोरगाव मंजूचा तरुण बेपत्ता; दीड महिन्यांपासून कुठलाही संपर्क नाही, कुटुंबीयांची धास्ती

बोरगाव मंजू (अकोला):

तालुक्यातील अजय शत्रुघ्न उपराटे (वय ३१) हा तरुण हातमजुरीसाठी निगडी, पुणे येथे गेलेला असताना

मागील 9 जूनपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अजय शुभम ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ट्रक चालक म्हणून कार्यरत होता.

मात्र 9 जून रोजी रात्रीच्या सुमारास त्याची बॅग सापडली आणि तो अचानक गायब झाला.

याप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल करण्यात आली असून गेल्या

दीड महिन्यांपासून अजयचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क नाही.

मोबाईलदेखील बंद येत असल्याने त्याच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आहे.

अजयचे कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकरी पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहेत,

मात्र अद्याप कोणताही ठोस मागोवा लागलेला नाही.

  बोरगाव मंजूकरांची प्रशासनाला विनंती –

अजयचा पत्ता लागण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक नेमावं, सीसीटीव्ही फूटेजची

चौकशी करावी आणि याप्रकरणी गतीने तपास करावा, अशी मागणी बोरगाव मंजूतील ग्रामस्थांनी केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/rumi-khenyasathi-from-work-free/