पुणे न्यायालयाने एका जुन्या प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. वीर सावरकर यांचे पणतू
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
खटला दाखल केला होता. मार्च २००३ साली इंग्लंडच्या दौऱ्यात
राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीबाबत बदनामीकारक
विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी मागच्या वर्षी
एप्रिल महिन्यात पुणे सत्र न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात
तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी वीर सावरकर
यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याचा त्यांनी आरोप केला
होता. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी ५ मार्च २०२३
रोजी इंग्लंड येथे केलेल्या एका भाषणाचा व्हिडीओ यासाठी सादर
केला होता. या प्रकरणी राहुल गांधी यांना आता २३ ऑक्टोबर
रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इंडिया टुडेने सदर बातमी दिली आहे. सात्यकी सावरकर आपल्या
तक्रारीत म्हणाले की, राहुल गांधी गेल्या काही वर्षांपासून
सातत्याने माझे आजोबा सावरकर यांचा जाणूनबुजून अवमान
करत आहेत. लंडन येथे ५ मार्च २०२३ रोजी ओव्हरसिस काँग्रेसला
संबोधित करताना त्यांनी ओढूनताणून सावरकरांना मध्ये आणले
आणि त्यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केले. राहुल गांधी
सावरकरांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर आरोप करताना म्हटले की,
त्यांनी जाणूनबुजून अशा शब्दांचा वापर केला, ज्यामुळे संपूर्ण
सावरकर कुटुंबियांना मानसिक त्रास झाला.
Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhis-hospitality-at-kolhapurat-congress-workers-koularu-house/