पुणे शहराजवळील खडकवासला धरण ९०.३९%, पानशेत
१००%, वरसगाव १००% आणि टेमघर १००% एवढ्या क्षमतेने
भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
धरण १००% क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा
कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी
सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे. आज २४/०९/२०२४ ते
२९/०९/२०२४ या कालावधीत हवामान विभागाने अतिवृष्टीचा
अंदाज दिल्यामुळे मुठा व पवना नदीपात्रात येव्या नुसार व मोठ्या
प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे, तसेच त्यानंतर
पर्जन्यमानानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/
जास्त करण्यात येईल. उपरोक्त विषयानुसार पुणे
महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी
चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना
नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये
आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास
तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सखल भागातील संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात न उतरण्याचा
सल्ला दिला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/konkan-goa-central-maharashtra-rainfall/