पुंडा गावात आज प्रोष्ठपदीच्या नंतरचा दिवस असून, लाडक्या गणरायाचे विसर्जन भक्तिभावाने पार पडले. गावातील तीन गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीत भक्तांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला.गणरायाला निरोप देताना, भक्तांनी “देवा, आज्ञा असावी; चुकले असेल तर माफ करा” अशी भावना व्यक्त केली. गावभर डी.जे., ताशा व बॅंड पार्टीचा निनाद वाजत राहिला. भक्तांचे भावनिक निरोप आणि उत्साह पाहून १० दिवस कसे निघून गेले ते कळलेच नाही.सुरक्षेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. दहीहंडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक डाबेराव, अवचार, हेड कॉन्स्टेबल कमोद लांडगे, मनीष वाकोडे, माधव कोरे, होमगार्ड सैनिक नितीन आखरे, राजेश शिवरकर तसेच तंटा मुक्ती अध्यक्ष निवृत्ती कुलट, ग्रामपंचायत उपसरपंच सुधाकर पुंडकर, कर्मचारी भास्करराव किसन पुंडकर, तुकाराम खेकडे, श्रीकृष्ण इंगळे आणि ज्ञानेश्वर भाई कुलट यांच्या सहकार्याने मिरवणूक सुरळीत पार पडली.भक्तांनी आनंद, श्रद्धा आणि उत्साहाने लाडक्या गणरायाला विसर्जन केले आणि पुढच्या वर्षी लवकर भेटीची इच्छा व्यक्त केली.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/kandivali-lalji-padayya-shopkankancha-suit-raudra-rage-old-age/