पुंडा येथे प.पू. मानपुरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहाचे आयोजन

पुंडा येथे मानपुरी महाराज पुण्यतिथी सप्ताह उत्साहात

अकोट : तालुक्यातील पुंडा येथे मोक्षवाशी प.पू. मानपुरी महाराज गुरू काशीपुरी

महाराज यांच्या ११व्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथवाचन,

महापूजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचा सप्ताह सुरू झाला आहे.

हा कार्यक्रम दत्तात्रय संस्थान पुंडा यांच्या वतीने २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमांतर्गत दररोज सकाळी काकड आरती (६ ते ७),

ग्रंथवाचन (९ ते १२ व ३ ते ५), सायंकाळी आरती व अन्नदान (६ ते ७),

तसेच रात्री सोळस पूजेचा कार्यक्रम (७ ते १०) आयोजित करण्यात आला आहे.

या पूजेसाठी पुणे, तारोळा, पाथर्डी, नागझरी आदी ठिकाणच्या अन्नदात्यांनी सहभाग घेतला आहे.

सप्ताहाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी सकाळी कळसस्थापना व ग्रंथवाचनाने झाली.

सप्ताहाच्या समारोपाला पालखीची गाव प्रदक्षिणा,

महाप्रसाद व रात्री बत्तिशी महापूजा प.पू. वासुदेव भारती गुरू बळीराम

भारती महाराज (दत्तशिखर माहूर) यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

दत्तात्रय संस्थान पुंडा व्यवस्थापन समितीने परिसरातील श्रद्धावानांना

या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

बाहेरगावाहून येणाऱ्या दत्त संप्रदाय भक्तांसाठी संस्थानच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/aaqib-shekuwale-central-bunket-officer-appointed/