अकोट तालुका, पुंडा (नंदिग्राम) येथे २७ मार्च ते ३० मार्च २०२५ या कालावधीत ‘श्री’ प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळा
आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. सदानंद महाराज गावंडे (विठ्ठल आश्रम, धोतर्डी),
विदाचार्य श्री सागर पाठक गुरुजी (अकोला) आणि ब्रम्हवृंद यांच्या हस्ते हा पवित्र सोहळा संपन्न होईल.
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:
-
श्रीची नगर प्रदक्षिणा, गणेश पूजन, पुण्याहवाचन, देवता स्थापना, कुंडपूजन, स्नपन विधी,
जलाधिवास, धान्यधिवास, हवन, प्रतिष्ठा होम, पूर्णाहुती आणि महाआरती.
-
गणमान्य व्यक्तींचा सत्कार समारंभ.
-
भाविकांसाठी महाप्रसाद.
मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सन्मान समारंभ:
-
उमेश गभने (माजी नगराध्यक्ष, मौदा, नागपूर)
-
महादेवराव पुंडकर (उद्योजक, टेक एमआयडीसी, अकोला)
-
श्री शिवहरी वामनराव कुलट (सेवानिवृत्त शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावती)
-
खासदार अनुप संजय धोत्रे (अकोला जिल्हा)
-
आमदार रणधीर भाऊ सावरकर
-
राजेश खोकले (संस्थापक अध्यक्ष, गजानन महाराज संस्थान, मुंडगाव)
या पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या
संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त मंडळ आणि समस्त गावकरी करत आहेत.
कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने होणार आहे.
भाविक भक्तांसाठी सुवर्णसंधी! जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्या!