राज्यात मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

कर्तव्य बजावण्याचे सरकारचे आवाहन

महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानिमित्त

राज्यात सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात

Related News

विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे.

तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार राज्यात मतदानाच्या

दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील नागरिकांना मतदान करता

यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून २० नोव्हेंबर

२०२४ साठी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात

ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची

कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक

उपक्रम आणि बँक या ठिकाणी ही सार्वजनिक सुट्टी लागू असणार

आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना महाराष्ट्र

शासनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. शासनाने २० तारखेला

मतदानाची सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व मतदारांना

मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय

घेतला आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन

शासनाने केले आहे. राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने

विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. तसेच ज्यांना पूर्ण

दिवस सुट्टी देणे शक्य नसेल त्यांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर

करावी असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. दरम्यान

भाजपने आपल्या पहिल्या यादीतून ९९ उमेदवारांची घोषणा केली

आहे. शिवसेनेने ४५ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३८ उमेदवार

जाहीर केले आहेत. तसेच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून

ठाकरे गटाने ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन

आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीने देखील आपले

उमेदवार जाहीर केले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/november-6-hearing-regarding-nationalist-party-symbol/

Related News