अकोला जिल्ह्यासाठी गौरवाची बातमी…! अर्चित चांडक सर्वोत्तम पोलीस अधीक्षक….!

पोलीस अधीक्षक

महाराष्ट्र राज्यात व अमरावती परिक्षेत्रात अकोला जिल्हा पोलीस दलाने आपल्या कार्यक्षम, पारदर्शक व नागरिक केंद्री कामगिरीद्वारे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील ३४ पोलीस जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले असून, त्यामध्ये अकोला पोलीस दलाने राज्यातील टॉप ३ पोलीस अधीक्षक मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

अकोला पोलीस दलाला एकूण २०० पैकी १४८.७५ गुण प्राप्त झाले असून, ही कामगिरी संपूर्ण राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गणली जाते. विशेष म्हणजे, अमरावती परिक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा पोलीस जिल्हा म्हणून अकोला जिल्हा पोलीस दलाची निवड झाली आहे.
26 जानेवारी 2026 रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून मूल्यमापन निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 34 पोलीस अधीक्षक कार्यालयांपैकी अकोला पोलीस अधीक्षक यांना तृतीय स्थान मिळाले. गणतंत्र दिनाच्या समारंभ दरम्यान ही बातमी सर्व अकोलेकरासाठी जाहीर करण्यात आली, त्यावेळी मा.ना. श्री. आकाश फुंडकर, कामगारमंत्री तथा पालकमंत्री, जिल्हा अकोला यांनी पोलीस अधीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ही कामगिरी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) या स्वतंत्र व निष्पक्ष संस्थेद्वारे प्रमाणित मूल्यमापनावर आधारित असून, त्यामुळे अकोला पोलीस दलाच्या कार्यपद्धतीतील गुणवत्ता व विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.पोलीस सेवा अधिक वेगवान, स्मार्ट व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने अकोला पोलीस दलाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पोलीस सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ई-गव्हर्नन्स, तसेच डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामध्ये त्रिनेत्र, रक्षा, GIS लोकेशन, व्हाट्स अँप चॅटबॉट कॉप कनेक्ट, वेब साईड, आपले सरकार, स्मार्ट डॅश बोर्ड, इत्यादी विषयावर विशेष भर देण्यात आला होता.या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम या मूल्यमापनात दिसून आला आहे.

अकोला जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सेवेसाठी सदैव तत्पर असून, भविष्यातही अधिक पारदर्शक, कार्यक्षम व तंत्रज्ञानाधिष्ठित पोलीस सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.सदरची कामगिरी पार पाडतांना सहकार्य करणारे श्री. किशन पनपालिया यांनी AI बेस प्रोजेक्ट त्रीनेत्र मध्ये मोलाचे विशेष सहकार्य केल्याबद्दल तसेच श्री. बी. चंद्रकांत रेड्डी अपर पोलीस अधीक्षक, एएसपी. अकोट श्री निखिल पाटील, प्रो. एएसपी. ईशानी आनंद, कार्यालय अधीक्षक श्री दिगंबर वनारे, API संगीता कदम, API मनीषा तायडे, पोउपनी सागर फेरण, प्रमुख लिपिक सचिन सांगळे, पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे, पो अंमलदार आशिष आमले पोस्टे सायबर, स्वप्नील दामोदर, पोस्टे सायबर, भूषण रंभापुरे, गौरव पवार, महेश डोंगरे तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांचे पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले .

Related News

read also :  https://ajinkyabharat.com/mahavitarans-annadata-te-urjadata-pictorial-attraction-became-the-attraction-of-the-flag-hoisting-program-organized-on-the-occasion-of-republic-day/

Related News