इस्राइलविरोधात मुस्लिम समुदाय आक्रमक, देशातील अनेक भागात निदर्शने

नसरल्लाहचा शहीद म्हणून केला उल्लेख

गतवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला देशात झालेल्या

दहशतवादी हल्ल्यानंतर मागच्या वर्षभरात इस्राइलने

Related News

दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेत हमास आणि

हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. या दोन्ही

संघटनांचे अनेक बडे नेते आणि कमांडर इस्राइलच्या हल्ल्यांमध्ये

मारले गेले आहेत. दरम्यान, इस्राइलने नुकत्याच केलेल्या एका

मोठ्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह हा सुद्धा

मारला गेला होता. त्यानंतर हिजबुल्लाहने आज हसन नसरुल्लाह

याचा अगदी गुप्तपणे जनाजा काढून त्याला एका अज्ञात ठिकाणी

दफन केले. दरम्यान, इस्राइलकडून सुरू असलेल्या या

कारवायांविरोधात भारतातील मुस्लिम समुदायाकडूनही संतप्त

प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आज शुक्रवारची नमाज

आटोपल्यानंतर देशातील काश्मीरपासून दिल्लीपर्यंत अनेक

ठिकाणी मुस्लिम समुदायाकडून इस्राइलविरोधात तीव्र निषेध

आंदोलने करण्यात आली. इराणचे सर्वोच्च नेते असलेल्या

अयातुल्ला खोमेनी यांनी आज शुक्रवारची नमाज आटोपल्यावर

इस्राइलवर जोरदार टीका केली. तसेच इस्राइल हा जगभरातील

मुस्लिमांचा शत्रू आहे असं सांगत त्यांनी शत्रूला पराभूत

करण्यासाठी जगभरातील मुस्लिमांनी एकत्र यावं, असं आवाहन

केलं. यादरम्यान, भारतामध्येही अनेक राज्यांत शुक्रवारची नमाज

झाल्यानंतर मुस्लिम समुदायाकडून इस्राइलविरोधात आंदोलन

करण्यात आले. यावेळी कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी

कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

दिल्लीमधील जोरबाग परिसरात असलेल्या शाह ए मर्दा

मशिदीबाहेर हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरुल्लाहचा शहीद असा

उल्लेख करून त्याचे फोटो लावण्यात आले होते. तसेच नमाज

आटोपल्यावर इथे इस्राइलविरोधात आंदोलन करण्यात आले,

बिहारमधील मुझफ्फरनगर येथे हिजबुल्लाहचा प्रमुख हसन

नसरुल्लाह याचा दहशतवादी असा उल्लेख करण्याविरोधात

आंदोलन करण्यात आले. तसेच मेणबत्ती मोर्चाही काढण्यात

आला. यावेळी लोकांनी हसन नसरुल्लाह याचा शहीद असा

उल्लेख करून इस्राइलविरोधात घोषणाबाजी केली.

लखनौमध्ये शिया धर्मगुरू कल्बे जव्वाद यांनी इराणने इस्राइलवर

केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचं समर्थन करताना हे स्वसंरक्षणार्थ

उचलेले पाऊल आहे, असे सांगितले. इस्राइलला शिक्षा मिळाली

पाहिजे. त्यांनी मानवतेविरोधात काम केलं आहे, असा आरोपही

त्यांनी केला.

Read also: https://ajinkyabharat.com/foreign-minister-s-jaishankar-will-be-taken-to-pakistan/

Related News