संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा -टॅरिफ धोरणांवर जोरदार हल्ला.

काही लोकांना भारताच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीचा त्रास होतो.

नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील

आयात शुल्क (टॅरिफ) धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. काही जागतिक नेते स्वतःला ‘सगळ्यांचे बॉस’ समजतात,

पण भारताच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो, असा आरोप त्यांनी केला.

Related News

सिंह यांनी सांगितले की, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर २५ % टॅरिफ वाढवले असून यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसेच रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्याच्या कारणावरून आणखी २५ % दंडात्मक टॅरिफ लावण्यात आले आहे.

ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत’ संबोधत भविष्यात आणखी शुल्क वाढविण्याचा इशारा दिला आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, “काही लोकांना भारताच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीचा त्रास होतो.

त्यांची मानसिकता अशी आहे की ‘सगळ्यांचे बॉस’ आम्ही आहोत, मग भारत एवढा पुढे कसा जातोय?” त्यांनी इशारा दिला की अशा

उपाययोजनांचा उद्देश भारतीय वस्तू जागतिक बाजारपेठेत महाग करणे आणि विक्री घटवणे हा आहे.

त्यांनी ठामपणे सांगितले की भारताच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही, आणि अशा अडथळ्यांनंतरही देश वेगाने पुढे जाईल.

Read also :https://ajinkyabharat.com/parbhanit-st-bus-nalayat-75-migrant-balbal-rescue/

Related News