उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

प्रशासन सज्जः २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभा

मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज

Related News

(ता.२२) पासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा

प्रशासनाकडून जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी

कार्यालयांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली असून, निवडणूक

यंत्रणा सज्ज झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

सार्वत्रिक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला

पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा

मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान घेण्यात

येणार आहे. त्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे व

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मंगळवार (ता. २२) पासून

सुरुवात करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना मंगळवार (ता.२२)

ते मंगळवार (ता. २९) दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर

करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाचही

विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून संबंधित

विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी

कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये अर्ज स्विकृतीच्या

प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

कागदपत्रांची जुळवाजुळव

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची

प्रक्रिया आजपासून सुरू होत असल्याने उमेदवारी अर्जासोबत

सादर करावयाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी

उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे.

अशी भरावी अनामत रक्कम

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये आणि

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच

हजार रुपये अनामत रकमेचा भरणा करावा लागणार आहे. रोख

स्वरुपातील अनामत रक्कम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे

सादर करता येणार आहे, अथवा बँकेमार्फत चलानद्वारे अनामत

रकमेचा भरणा करता येणार आहे. चलानद्वारे भरणा केलेल्या

अनामत रकमेचे चलान उमेदवारी अर्जासोबत सादर करणे

बंधनकारक आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/8-candidates-declared-under-sambhaji-rajes-third-alliance/

Related News