आजच्या धकाधकीच्या जीवनात ऑफिस हे केवळ काम करण्याचं ठिकाण राहिलेलं नाही, तर अनेकांच्या आयुष्याचा मोठा भाग बनलं आहे. दिवसातील तब्बल 8 ते 9 तास एकत्र घालवताना सहकाऱ्यांमध्ये मैत्री निर्माण होते आणि अनेक वेळा ही मैत्री प्रेमातही बदलते. त्यामुळे “ऑफिस रोमांस” हा आता केवळ सिनेमांपुरता मर्यादित राहिलेला विषय नसून, तो कॉर्पोरेट संस्कृतीचा एक वास्तव भाग बनला आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध व्यावसायिक मासिक फोर्ब्सने केलेल्या सर्व्हेने अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे. या सर्व्हेनुसार, तब्बल 60 टक्क्यांहून अधिक कर्मचारी त्यांच्या करिअरच्या काळात कधी ना कधी ऑफिसमधील रोमँटिक रिलेशनशिपमध्ये राहिले आहेत. या सर्व्हेतील आकडेवारी आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकजण त्यांचे वैयक्तिक अनुभवही शेअर करत आहेत.
ऑफिसमध्येच का जुळतात नाती?
सध्याच्या काळात लोकांचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच टीमसोबत काम करताना सहकाऱ्यांमध्ये भावनिक जवळीक निर्माण होते. कामाचा ताण, प्रोजेक्टचा प्रेशर आणि करिअरची चिंता समजून घेणारी व्यक्ती जवळ असल्याने अनेकांना मानसिक आधार मिळतो. त्यामुळे ऑफिसमध्येच पार्टनर शोधण्याचं प्रमाण वाढत असल्याचं या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे.
Related News
राज्यातील बालविवाहाच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. बालविवाह ही केवळ सामाजिक समस्या नसून मुलींच...
Continue reading
नवी दिल्ली : एअर इंडियाची एक फ्लाईट पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे निघालेल्या एअर इंडियाच्या AI-479 या विमानाने चुक...
Continue reading
ओमराजे शिंदे गटात, पण भाऊ ठाकरे गटातच : महाराष्ट्रातील 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना वेग आला असतानाच धाराशिवच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशि...
Continue reading
Ketan Agarwal Murder: 26 वर्षीय संचालकाच्या हत्येमागील 8 धक्कादायक सत्य समोर
पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी ...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
धडाकेबाज कामगिरी! Skoda Kushaq ने 5 वर्षांत 1 लाख विक्रीचा ऐतिहासिक टप्पा पार केला
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मध्यम आकाराच्या एसयूव्हींची मागणी झपाट्याने वाढत असताना स्कोडा इंडियाच्...
Continue reading
10 वर्षांपासून शेकडो माकडांची सेवा करणाऱ्या निवृत्त पोलीस मालती प्रेरणादायी प्रवास, व्हिडीओने जिंकली लोकांची मनं
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकीची उदाहरणे क्वचितच पाहा...
Continue reading
लोहगड हत्या प्रकरण : आधी पासपोर्ट चोरीला, मग वाढदिवसाच्या बहाण्याने लोहगडावर नेलं; केतनच्या वडिलांचे धक्कादायक आरोप
पुणे : पुण्यातील उद्योजक कुटुंबातील ...
Continue reading
Revathi Marriage: रेवती सुळेंच्या लग्नात काश्मिरी गर्ल कायनात धारची चर्चा; पार्थ पवारांसोबत अनेकदा दिसलेली ही तरुणी नेमकी कोण?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सु...
Continue reading
सुकृत देवची मोठी कमाल : स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा बहुचर्चित आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेला ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आह...
Continue reading
सिया गोयलवर गंभीर आरोप : लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा झालेला मृत्यू सुरुवातीला अपघात मानला जात होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासातून...
Continue reading
रेवती सुळेच्या भव्य लग्नात प्रिया सरोजचा स्टायलिश जलवा : मुंबईमध्ये 20 जून रोजी पार पडलेला रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांचा विवाहसोहळा हा केवळ एक कौटुंबिक कार्यक्र...
Continue reading
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, 65 टक्के लोकांनी ऑफिस रिलेशनशिपमुळे कामाच्या ठिकाणी “कंफर्टेबल” वाटत असल्याचं सांगितलं. तर 61 टक्के लोकांच्या मते, ऑफिसच्या बाहेर नवीन लोकांना भेटण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तयार होणारी जवळीक प्रेमात बदलते.
कामात वाढतो उत्साह
ऑफिस रोमांसचा सकारात्मक परिणामही अनेकांनी मान्य केला आहे. सर्व्हेतील 38 टक्के लोकांनी सांगितलं की, ऑफिसमध्ये आवडती व्यक्ती असल्यामुळे काम अधिक उत्साहाने होतं. कामाचा कंटाळा कमी होतो, ऑफिसमध्ये जाण्याची इच्छा वाढते आणि मानसिक ताणही कमी होतो.अनेकांनी हेही मान्य केलं की, ऑफिसमधील पार्टनर हा त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतो. कारण दोघेही एकाच वातावरणात काम करत असल्याने एकमेकांच्या अडचणी समजून घेणं सोपं जातं.
पण सर्वात मोठी भीती कोणती?
ऑफिस रिलेशनशिप जितकी आकर्षक वाटते, तितकीच ती धोकादायकही ठरू शकते. सर्व्हेनुसार, सर्वाधिक भीती “ब्रेकअप”ची असते. कारण नातं संपल्यानंतरही त्या व्यक्तीसोबत रोज काम करावं लागतं. एकाच मीटिंगमध्ये बसणं, रोज समोर येणं आणि व्यावसायिक संवाद ठेवणं अनेकांसाठी मानसिकदृष्ट्या कठीण ठरतं.54 टक्के लोकांनी सांगितलं की, ऑफिस डेटिंगमुळे त्यांच्या वर्क-लाईफ बॅलन्सवर परिणाम झाला. अनेकदा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य एकमेकांत मिसळल्याने तणाव वाढतो.
ऑफिसमध्ये गुपित राहतच नाही!
ऑफिसमध्ये एखादं अफेअर सुरू झालं की, ते जास्त काळ लपून राहत नाही, हेही या सर्व्हेतून समोर आलं आहे. सहकाऱ्यांचं निरीक्षण, एकत्र ब्रेक घेणं, वारंवार संवाद आणि सोशल मीडिया पोस्टमुळे रिलेशनशिपचा अंदाज लावला जातो.60 टक्के लोकांच्या मते, ऑफिसमधील अफेअर हा कायम गॉसिपचा विषय बनतो. एकदा रिलेशनशिप उघड झाल्यानंतर अनेक सहकाऱ्यांचं वागणं बदलतं. काही जण पाठिंबा देतात, तर काहीजण टीका किंवा कुजबुज सुरू करतात.
40 टक्के लोकांना मिळाला धोका
या सर्व्हेतील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, ऑफिस रिलेशनशिपमध्ये फसवणुकीचं प्रमाणही मोठं आहे. जवळपास 40 टक्के लोकांनी त्यांच्या पार्टनरने धोका दिल्याचं सांगितलं. काहींनी “चीटिंग”चा अनुभव सांगितला, तर काहींनी नातं अचानक संपल्याचं म्हटलं.
यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचंही समोर आलं आहे. विशेषतः रोज त्या व्यक्तीसोबत काम करावं लागत असल्याने परिस्थिती अधिक अवघड बनते.
तरीही अनेक जण पोहोचले विवाहबंधनात
ऑफिस रिलेशनशिपबाबत नकारात्मक अनुभव असले तरी, अनेक प्रेमकथा यशस्वीही ठरल्या आहेत. सर्व्हेनुसार, 43 टक्के लोकांनी ऑफिसमधील पार्टनरसोबत लग्न केलं आहे. म्हणजेच, अनेकांसाठी ऑफिस हे केवळ करिअरचं नाहीतर जीवनसाथी मिळवण्याचंही ठिकाण ठरत आहे.
कंपन्यांची मानसिकताही बदलली
पूर्वी ऑफिस रिलेशनशिपकडे चुकीच्या नजरेने पाहिलं जात होतं. मात्र आता कंपन्यांची मानसिकता बदलत असल्याचं सर्व्हेत दिसून आलं आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्या आता कर्मचार्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करत आहेत.62 टक्के लोकांनी त्यांच्या रिलेशनशिपची माहिती HR विभागाला दिल्याचं सांगितलं. काही कंपन्या तर ऑफिस रिलेशनशिपसाठी स्वतंत्र पॉलिसीही तयार करत आहेत, जेणेकरून कामावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ नये.
सोशल मीडियावर रंगली चर्चा
फोर्ब्सचा हा सर्व्हे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांनी ऑफिस रोमांसला “नव्या काळाची वास्तवता” म्हटलं आहे, तर काहींनी यामुळे ऑफिसचं वातावरण बिघडत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.दरम्यान, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या कामाच्या तासांमुळे ऑफिस रिलेशनशिपचं प्रमाण वाढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र, प्रेम आणि प्रोफेशन यांच्यात समतोल राखणं हेच सर्वात मोठं आव्हान असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/lieutenant-general-raja-subramani-holds-the-huge-responsibility-for-the-countrys-security/