२००७ मध्ये अमेरिकन सिनेट न्यायपालिकेसमोर एक अहवाला सादर केला होता.
रशियाचे अध्यक्ष हे जगातील सर्वात श्रीमंत राजकीय व्यक्ती असल्याचा दावा त्या अहवालात केला आला होता.
त्यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्स इतकी आहे.पृथ्वीतलावरील सर्वात श्रीमंत नेता म्हणून
Related News
व्लादीमीर पुतीन यांचे नाव घेतले जाते. व्लादिमीर पुतिन यांनी स्वत:ला रशियाचे
तहहयात अध्यक्ष करुन टाकले आहे. व्लादीमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष असून ते जगातील
सर्वात श्रीमंत राजकारणी देखील आहेत.पुतिन यांना वार्षिक 140,000 डॉलर (सुमारे 11.7 कोटी रुपये ) वेतन मिळते.
२००७ मध्ये अमेरिकन सिनेट न्यायपालिकेसमोर सादर केलेल्या अहवालात पुतिन हे
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला होता.
त्यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्स इतकी आहे. तथापि, २०१५ मध्ये फोर्ब्स मासिकाने म्हटले होते
की पुतिन यांच्या संपत्तीची पडताळणी करता येत नाही, ज्यामुळे त्यांना श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट करणे कठीण झाले.
व्लादिमीर पुतिन हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग,
ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन आणि फ्रान्सचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्यापेक्षाही श्रीमंत असल्याचा दावा केला जातो.
अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅगझिन ‘फॉर्च्यून’च्या २०१५ च्या एका अहवालात पुतीन
यांच्याकडे २० हून अधिक आलिशान राजवाडे आणि सुमारे ७०० गाड्या असल्याचा दावा करण्यात आला होता.
याशिवाय त्यांच्याकडे ५८ खाजगी विमाने आणि ‘द फ्लाइंग क्रेमलिन’ नावाचे एक हेलिकॉप्टर देखील आहे.
पुतिन यांच्याकडे ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची आलिशान खाजगी बोट आहे. या बोटीचे नाव ‘शेहराजादे’ असे आहे.
पुतिन यांना लक्झरी घड्याळे खूप आवडतात. त्याच्याकडे असंख्य घड्याळे आहेत,
ज्यांची किंमत ६० हजार ते ५ लाख डॉलर्सपर्यंत आहे.ब्लॅक सी म्हणजेत काळ्या समुद्राच्या काठावर
पुतीन यांचे १९०,००० चौरस फूट पसरलेले एक भव्य राजवाड्यासारखे घर आहे.
या राजवाडा सदृश्य घराची किंमत १ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.
पुतीनच्या या राजवाड्यात एक भूमिगत बंकर देखील आहे. याशिवाय, स्विमिंग पूल, जिम, कॅसिनो, सिनेमा हॉल
अशा जबरदस्त सुविधा देखील आहेत. याशिवाय पुतीन यांच्याकडे एक घोस्ट ट्रेन देखील आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shevatchaya-shakat-7-dhawanchi-thunder-pahilya-4-chendoot-4-wicket-tarhi-golandajawar-footlum-asan-khapar/