प्राचार्य संजय सौंदळे यांचा सेवापूर्ती सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न

प्राचार्य सौंदळे यांचा गौरवसोहळा

पातूर  – वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,

पातूरचे प्राचार्य  संजय सौंदळे यांनी तब्बल ३३ वर्षे

शैक्षणिक सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर नियत

वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली.

त्यांच्या कार्यगौरवासाठी विद्यालयात सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी इंदिरा गांधी विद्यालय

व उच्च माध्यमिक विद्यालय पातूरच्या प्राचार्या सौ. मीरा ढोकणे या होत्या.

प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ शिक्षक अनिल सोनटक्के सर उपस्थित होते.

तर सत्कारमूर्ती म्हणून प्राचार्य संजय सौंदळे सर उपस्थित होते.

शांत, संयमी, सोज्वळ, कार्यकुशल अशा व्यक्तिमत्त्वाच्या

प्राचार्य सौंदळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच विद्येची

देवी माता सरस्वतीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनोगतं व्यक्त करत

सौंदळे सरांच्या कार्याचा गौरव केला. भावपूर्ण वातावरणात सरांना निरोप देण्यात आला.

मनोगतात प्राचार्य संजय सौंदळे यांनी,

“आदरणीय रामसिंगजी जाधव साहेबांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही तडा जाऊ दिला नाही.

त्यांच्या उपकारांचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही,”

असे विचार मांडले. तसेच आपल्या कार्याचा गौरव

केल्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षकवर्ग आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. टी. गाडगे यांनी केले,

तर आभार प्रा. एस. बी. आठवले यांनी मानले.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read also : https://ajinkyabharat.com/azhad-maidanavar-tufan-rada-supriya-supriya-yana-andolkankan-gherav-karvar-bottle-fakelia-incident/