पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.26) पुणे दौऱ्यावर येणार होते.

शहरातील महत्त्वकांशी अशा नव्या मेट्रो लाईनचे उद्घाटन नरेंद्र मोदी

यांच्या हस्ते होणार होते. आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी

Related News

भाजप श्रेष्ठी हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. मागील दोन दिवस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यानंतर

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासकामांच्या उद्घाटनासाठी

पुण्यामध्ये येणार होते. त्यामुळे महायुतीसाठी पंतप्रधान मोदींचा हा

दौरा महत्त्वाचा मानण्यात येत होता. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते

विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर परशूराम महाविद्यालय

मैदानावर होणार होता. आता मात्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा

दौरा रद्द करण्यात आला आहे. पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा

टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट

भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित

भुयारी मार्गाचे भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

होणार होते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती

सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

भूमिपूजन होणार होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एस.पी.

कॉलेजवर जाहीर सभा होणार होती. मात्र मागील दोन

दिवसांपासून पुणे शहराला पावसाने झोडपले आहे. त्यामुळे नरेंद्र

मोदींचा दौरा रद्द करण्यात आला असून याआधी सभेचे ठिकाण

बदलण्याची तयारी सुरु होती. आता मात्र दौरा रद्द करण्यात

आल्याची माहिती समोर आली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/there-is-no-survey-for-the-pikas-suffering-loss-after-filing-complaint-since-last-two-months/

Related News