पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली यूक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली

रशिया

रशिया आणि युक्रेनमधील अडीच वर्षांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युक्रेनमध्ये पोहोचले.

येथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांची भेट घेतली.

Related News

त्यानंतर दोन्ही नेते युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयात पोहोचले,

जिथे त्यांनी युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांच्या

खांद्यावर हात ठेवून या सर्व परिस्थितीत मृत पावलेल्यांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या.

दरम्यान, त्यांनी फोमिन बोटॅनिकल गार्डन येथील महात्मा गांधींच्या

पुतळ्यालाही पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर युक्रेनची स्थापना झाली.

तेव्हापासून आजपर्यंत एकही भारतीय पंतप्रधान युक्रेनला गेले नव्हते.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा दौरा अत्यंत महत्त्वाचा

मानला जात आहे. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांच्या सोबत

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या युद्धातील काही फोटो देखील बघितले.

मोदींच्या रशिया दौऱ्यावर युक्रेनने तीव्र आक्षेप व्यक्त केला होता आणि

जेलेंस्की यांनी याबाबत नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/udyacharya-maharashtra-bandwar-mumbai-high-court-banned/

Related News