ऑलिम्पिक 2036 भारतात भरवण्यासाठी प्रयत्नशील – प्रधानमंत्री मोदी

भारत

भारत आपल्या स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं.

देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Related News

ज्यामुळे देशातील हजारो क्रीडापटूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणादरम्यान, 2036 च्या ऑलिम्पिकचे

यजमानपद भारतासाठी त्याचे स्वप्न असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

पीएम मोदी म्हणाले की, “जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करून

भारताने दाखवून दिले आहे की आपला देश मोठ्या प्रमाणावर

कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो. आता 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन

करण्याचे भारताचे स्वप्न आहे. यासाठी आम्ही तयारी करत आहोत.

यासोबतच पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

जाणाऱ्या खेळाडूंचे मोदींनी अभिनंदन केले.

Read also: https://ajinkyabharat.com/eye-and-dental-check-up-camp-jointly-organized-by-aadhaar-foundation-and-dr-sugata-waghmare/

Related News