स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘देश का गर्व-प्रदेश की कला’ मध्ये अजिंठा, वेरुळचा सन्मान!

टाटा टी प्रीमियम

टाटा टी प्रीमियमचा पुढाकार

सर्व रक्कम वंचित समुदायातील मुलांना भोजन पुरवण्यासाठी दिली जाणार

देश की चाय म्हणून नावाजल्या जाणारा, टाटा कन्ज्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा

Related News

प्रमुख चहा ब्रँड टाटा टी प्रीमियमने यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त

देश का गर्व प्रदेश की कला हा आपला उपक्रम पुन्हा सुरु सुरु केला आहे.

भारताची स्वातंत्र्योत्तर काळातील अभिमानास्पद कामगिरी दर्शवणाऱ्या

गोष्टींचा गौरव यामध्ये केला जात आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून

गौरवण्यात आलेली, अजिंठा आणि वेरूळ ही महाराष्ट्रातील ठिकाणे याचेच

ठळक उदाहरण आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील वाटचालीतील हे महत्त्वाचे टप्पे

भारताचा अभिमान आहेत त्यांचे महत्त्व लोकांच्या मनावर कायमचे ठसवले जावे

यासाठी टाटा टी प्रीमियमने देश का गर्व हे लिमिटेड एडिशन कलेक्शन सादर केले आहे,

जे क्षेत्रीय कलांपासून प्रेरणा घेऊन तयार केले आहे.

देशातील विविध राज्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांचा गौरव करताना देशाभिमानाची

भावना जागृत करण्याच्या ब्रँड परंपरेला अनुसरून,

भारतातील विविध राज्यांमधील संस्कृतींपासून प्रेरणा घेऊन,

अनोख्या क्षेत्रीय कलांमध्ये प्रत्येक सेट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने

चित्रित करण्यात आला आहे. देशाभिमान जागृत करण्याच्या ब्रँड परंपरेला अनुसरून,

टाटा टी प्रीमियमने आपल्या उपक्रमामध्ये भारतातील पहिले जागतिक वारसा ठिकाण

अजिंठा-वेरूळ लेण्यांना सन्मानित केले आहे.

अतिशय उठावदार, मनमोहक पैठणीने प्रेरित होऊन अजिंठा वेरूळ लेणी

चित्रित करण्यात आली आहेत. अजिंठा-वेरूळ लेण्यांचे सांस्कृतिक महत्त्व

आणि महाराष्ट्रातील पैठणी कलेची समृद्ध परंपरा या दोन्ही गोष्टी

या चित्रातून दिसून येतात. भारताच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाला

अतिशय सार्थक आणि शानदार अभिवादन या चित्रातून करण्यात आले आहे.

या कलेक्शनच्या विक्रीतून उभी राहणारी सर्वच्या सर्व रक्कम

वंचित समुदायातील मुलांना भोजन पुरवण्यासाठी दिली जाणार आहे.

टाटा कन्ज्यूमर प्रॉडक्ट्सचे प्रेसिडेंट पॅकेज्ड बेवरेजेस पुनीत दास यांनी सांगितले,

खऱ्या अर्थाने देश की चाय टाटा टी प्रीमियमने चवींशी निगडित विविध

आवडीनिवडी नेहमीच पूर्ण केल्या आहेत. त्यासोबतच भारतातील समृद्ध संस्कृती

व अभिमान यांचा गौरव करण्यात देखील आमचा ब्रँड नेहमीच आघाडीवर असतो.

देशाभिमान जागृत करणारे हे कलेक्शन क्षेत्रीय कलांमध्ये

अतिशय सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे ग्राहकांना देशाचा इतिहास दर्शवणारे एक प्रतीक

स्वतःजवळ ठेवता येईल, इतकेच नव्हे तर मुलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे हास्य

आणण्यात योगदान देता येईल कारण या कलेक्शनच्या विक्रीतून उभी राहणारी

सर्वच्या सर्व रक्कम वंचित समुदायातील मुलांना भोजन पुरवण्यासाठी दिली जाईल.

द प्लेटेड प्रोजेक्टच्या सहयोगाने ही मदत केली जाईल.

Read also: https://ajinkyabharat.com/countrywide-movement-of-22nd-august-congress/

Related News