आशुतोष गोवारीकर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी

जगभरातील चित्रपटप्रेमींमध्ये मानाचा समजला जाणारा अजिंठा

वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे.

Related News

छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत हा

महोत्सव होणार असून अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट

महोत्सवाच्या समितीनं या महोत्सवाची रुपरेषा सांगितली आहे.

यात आशुतोष गोवारीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात

आली आहे. या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर

कागलीवाल आणि मुख्य संरक्षक अंकुशराव कदम यांच्या

नेतृत्वाखालील आयोजन समितीने महोत्सवाची माहिती दिली.

आयोजक समितीने चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाबाबत

सदस्यांची नावे जाहीर केली असून त्यात आशुतोष गोवारीकर

आणि सुनील सुकथनकर या नामवंतांचा समावेश आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व

मराठावाडा आर्ट कल्चर व फिल्म फाऊंडेशनच्या वतीने मागील ९

वर्षांपासून अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव छत्रपती

संभाजीनगर येथे आयोजीत केला जातो. केंद्र सरकारच्या सूचना

आणि प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी व महाराष्ट्र शासनाच्या

सहकार्यानं हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा या चित्रपट

महोत्सवाचं १० वं वर्ष आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/maratha-movement-adwala-on-both-sides-of-dhule-solapur-highway/

Related News