मराठी रंगभूमीचा अभिजात इतिहास घडवणारी अनेक नाटकं आजवर झालीत.
ही यादी इतकी मोठी आहे की, प्रत्येकाचं नाव यामध्ये घेणं जवळपास अशक्यच.
यामधील अनेक नाटकांचे विक्रमी प्रयोग झालेही.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
आजच्या घडीलाही नवी पिढी वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं रंगभूमीवर
घेऊन येतायत. पण असं असलं तरीही एखाद्या नाटकाचे विक्रमी प्रयोग होणं
ही गोष्ट फार दुर्मिळ झाली आहे. असं असलं तरीही एका नाटकाची जादू
ही रंगभूमीवर आजतागायत जिवंत आहे, ही विशेष बाब आणि ते नाटक म्हणजे
भरत जाधव यांचं ‘सही रे सही’ नाटक.
येत्या 15 ऑगस्ट रोजी या नाटकाचा बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात
4444 वा प्रयोग होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी भरत जाधव यांच्या
मोरुची मावशी आणि अस्तित्व या नाटकाचे देखील प्रयोग याच दिवशी
या नाट्यगृहात होणार आहेत. भरत जाधव एन्टरटेन्मेंटतर्फे ‘सही रे सही’च्या या
विक्रमी प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थिती लावणार आहेत.
राज ठाकरेंच्या उपस्थितीवर भरत जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की,
‘ऑल दि बेस्ट’ नाटकापासून राज ठाकरे खूप जवळ आलेली व्यक्ती आहे.
माझ्या आयुष्यात त्यांनी खूप हातभार लावला आहे.
अर्थात बाळासाहेबांच्यासोबत असल्यापासून त्यांचा आशीर्वाद आहे.
‘सही रे सही’बाबत बोलायचं झालं तर या एका व्यक्तीने ते नाटक समोरुन पाच वेळा पाहिलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/microplastics-found-in-all-brands-of-sweet-and-sugar-sold-in-india/