प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून पुनरागमनाच्या तयारीत!

आभाळात

आभाळात मेघांची दाटी, पाऊस मुसळधार बरसण्याच्या तयारीत

अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी 

राज्यात सुरु असलेला मान्सून प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमनाच्या तयारीत

Related News

आहे. आजपासून तो पुन्हा एकदा अस्तित्व दाखविण्यासाठी सज्ज झाला असून,

महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस बरण्याची शक्यता आहे.

या काळात वातावरण थंड आणि आकाश ढगाळ राहील. तसेच, राज्यातील

आज आणि उद्याचे हवामान पर्जन्यवृष्टीस अनुकुल राहील असे आयएमडीचे

संकेत आहेत. काही जिल्ह्यांसाठी संभाव्य परिस्थितीचा विचार करुन ऑरेंज

अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घ्या राज्यातील हवामान आणि

पावसाची स्थिती. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अंदमान बेट आणि

समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात

पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी मेघराजा दमदार

बरसण्याच्या तयारीत आहे. आजपासून पुढचे चार ते पाच दिवस राज्यातील

बहुतांश भागात पाऊस आपले अस्तित्व दाखवून देण्याची शक्यता आहे.

अर्थात त्यात रिमझीम, हलका ते मध्यम आणि मुसळधार पाऊस अशी विविधता

पाहायला मिळू शकते. हवामान विभाग पुणे शाखेने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले

आहे की, मान्सून 2024 आता परतीच्या विचारात आहे. त्यामुळे येत्या 23 सप्टेंबर

पासून पश्चिम राजस्थानातून त्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होऊ शकते.

त्याचा परीणाम म्हणून गोवा आणि कोकण परिसरात हलका ते मध्यम किंवा

तुरळत पाऊस पाहायला मिळू सकतो. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा

आणि विदर्भ या विभागांमध्ये मात्र पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस

कसळू शकतो. हवामान विभागाने म्हटले आहे की, राज्यात पावसासाठी पोषक

झालेले वातावरण पुढचे चार ते पाच दिवस कायम राहील. आज म्हणजेच सोमवार

(23 सप्टेंबर) पासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून, मुंबई, ठाणे,

पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस उपस्थिती दर्शवू शकतो.

रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, हिंगोली आणि नांदेड या

भागांमध्ये विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह

वादळाचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर,

वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह

वादळी पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी

वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/south-star-chiranjeevi-boat-registered-in-guinness-book/

Related News