प्रवीणभाईंचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस – “प्रकाशवाट” उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा

“प्रकाशवाट” उपक्रमाशी जोडला वाढदिवस

मुर्तीजापूर – जीवनातील सुवर्णमहोत्सवी क्षण म्हणजेच ५०वा वाढदिवस

हा प्रत्येकासाठी खास असतो.

मात्र हा दिवस वैयक्तिक आनंदापुरता मर्यादित न ठेवता समाजहितासाठी

अर्पण करण्याचा स्तुत्य निर्णय प्रवीणभाई ढगे यांनी घेतला.

आपल्या वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत वाटून त्यांना प्रेरणेची अनमोल भेट दिली.

“प्रकाशवाट” – ग्रामीण भागासाठी उजेडाची किरणे

मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्री. अनिल किलोर यांच्या संकल्पनेतून

मुर्तीजापूर येथे सुरू झालेला “प्रकाशवाट” उपक्रम

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

आर्थिक अडचणी व मार्गदर्शनाअभावी मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना

संधी मिळावी या हेतूने काही सेवाभावी शिक्षक

आणि समाजसेवकांनी हा उपक्रम सुरू केला.

पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निवड केली जाते

आणि त्यांना नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते.

सध्या १५० विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी सकाळी १० ते दुपारी ४ या

वेळेत अभ्यास करत आहेत.

अली सर (अध्यक्ष), बांबळ सर, देवके सर आणि सहकारी शिक्षक अखंड परिश्रम घेत आहेत.

नाश्त्यातून सामाजिक जाणीव

प्रत्येक शनिवार–रविवारी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी

असलेल्या व्यक्तींकडून नाश्ता देण्याची परंपरा आहे.

या परंपरेशी आपला सुवर्णमहोत्सवी वाढदिवस जोडत प्रवीणभाई ढगे

यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. त्यांच्यासाठी तेच खरं गिफ्ट ठरलं.

वृक्षारोपणाचा संदेश

या प्रसंगी सोपानभाई भोकरे, अॅड. दिलीप देशमुख,

शुभदाताई कुलकर्णी, गजाननभाऊ शहाळे, देवानंद सोनुले,

राजेश बनारसे, समाजसेवक विलास वानखडे,

मनोहर गावंडे व पत्रकार दिलीप तिहिले उपस्थित होते.

सर्वांनी मिळून सामाजिक बांधिलकीची जपणूक केली.

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला.

 प्रवीणभाईंचा सुवर्णमहोत्सव हा केवळ उत्सव न ठरता – समाजहित,

विद्यार्थ्यांवरील प्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांचा प्रेरणादायी संगम ठरला.

Read also :https://ajinkyabharat.com/muthi-baatami-bharatasamor-natmastak-trump-s/