प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.

प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.

गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे

प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मातेफिरूनी शाई फेक करून प्राणघातक

हल्ला करण्याचा प्रयत्न केला या सर्वांवर कोठारात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन,

Related News

जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक आणि ऐतिहासिक सत्यांचा पुनर्विचार करून विचार मांडणे हे प्रत्येक भारतीय

नागरिकाचे मूलभूत अधिकार आहेत. परंतु सामाजिक संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर

काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ला करत काळे फासले, ही घटना अत्यंत निंदनीय,

असंविधानिक आणि लोकशाही मुल्यांना विरोध करणारी आहे.

गायकवाड यांनी आजवर ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर विचारपूर्वक भाष्य केले आहे.

समाजातील वंचित घटकातील होतकरू तरुणांना रोजगाराचे एक मोठे व्यासपीठ त्यांनी तयार करून दिले आहे,

त्यांचे विचार पटोत वा न पटोत, त्यावर प्रतिवाद करणे हे लोकशाही मार्गानेच व्हावे हीच संविधानाची अपेक्षा आहे,

परंतु त्यांच्या वैचारिक भूमिकेला हिंसक विरोध करून त्यांना लक्ष्य करणे,

हा सामाजिक अहिंसेच्या तत्त्वांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान आहे.

असे संभाजी ब्रिगेडने निवेदनात म्हटले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/madhya-pradesh-madhya-pradesh-potchi/

Related News