पातुर नंदापुर: कोळंबी ते बोरगाव खुर्द रोडवरील कामामुळे अती पावसामुळे पातुर-नंदापुर एसटी बस सेवा आठ दिवस बंद होती. रोडवर बस चिखलात अडकून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. विद्यार्थी, महिला आणि नागरिकांना अकोला जाण्यासाठी खाजगी वाहने वापरावी लागली.
पातुर-नंदापुरचे सरपंच सचिन लाखे यांनी अकोला एसटी डेपो मॅनेजर भिवटे यांच्याकडे तक्रार केली. चालक कुळमेटे आणि वाहक एस.यू. राऊत यांनी प्रयत्न करून खराब रस्त्यांवरून बस सेवा पुन्हा सुरू केली. त्यांच्या हिम्मतीमुळे गावातील नागरिकांना प्रवासाची सोय झाली आणि नागरिकांनी बस सेवा सुरू केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
read also :https://ajinkyabharat.com/atyatiya-sports-suvarna-vijay/
