Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत
कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणलं आहे.
तो जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये असताना बाहेर मोठी गर्दी जमली होती. एकदा हे Photos बघा.
Related News
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात
शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
कोल्हापूर जुना राजवाडा बाहेरची ही दृश्य आहेत.
मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमलेले आहेत.
प्रशांत कोरटकर सध्या या पोलीस स्टेशनमध्ये आहे.
कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत. प्रशांत कोरटकरला आज दुपारी कोल्हापूर
न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
प्रशांत कोरटकरवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर हे शिवप्रेमी जमलेले आहेत.
प्रशांत कोरटकरला काल तेलंगणमधून अटक करण्यात आली.
त्याला आज सकाळी कोल्हापुरला आणण्यात आलं.
‘9 नंबरच पायथान आहे, बरोबर मला त्याच्या गालावर उठवायचं आहे.
आम्ही शिवभक्त इतके संतापलेले आहोत. या हरामखोराने छत्रपतींचा अवमान केला आहे.
तो आज राजरोसपण आव आणून दाखवतो की, मला काही फरक पडत नाही,
म्हणून त्याला कोल्हापुरी हिसका दाखवण्यासाठी ही चप्पल आणलेली आहे” अशी प्रतिक्रिया एका शिवप्रेमीने दिली.
“सध्या त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट चालू आहे. कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर सरकारी रुग्णालयात नेलं जातं.
पण या हरामखोराला, चिल्लर माणसाच्या तपासणीसाठी सरकारी डॉक्टर इथे आलेले आहेत.
जावय आहे का हा?” अशा शिवप्रेमींच्या भावना आहेत.