पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी करताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. काही महिला खेवलकरच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ असल्याचा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला होता.पतीसाठी मैदानात उतरलेल्या रोहिणी खडसे यांच्या प्रयत्नांनंतर आणि काही महिन्यांच्या न्यायिक प्रक्रियेच्या नंतर, खेवलकर यांना अखेर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे जावयाला मोठा दिलासा मिळाला आहे.पुण्यात अशा प्रकारच्या पार्टींचा खेवलकर यांचा आधीही इतिहास असल्याचे समोर आले आहे. प्रकरणानंतर रोहिणी खडसे पुण्यात धाव घेतल्या आणि त्यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. या प्रकरणावर पुढील भाष्य त्यांनी करताना संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.सुप्रिया सुळे यांनीही रोहिणी खडसे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. जामीन मिळाल्यानंतर प्रांजल खेवलकर आता मुक्त असून, पुढील तपास सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/pakistanla-battingsathi-invitation/
