अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा भव्य धम्म मेळावा
अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात आयोजित भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर थेट टीका केली. राज्यात शेतीची अतोनात नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचे संसार पाण्याने वाहून गेले तरीसुद्धा तातडीची मदत सरकारकडून मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.भाजप व आरएसएसच्या विचारसरणीत “मदत” हा शब्दच नसल्याचे सांगत त्यांनी म्हणाले की, ज्या घरात पाणी शिरले त्यांचे जीवन उध्वस्त झाले तरी सरकार फक्त दिवाळीसाठी मदत देण्याचे आश्वासन देत आहे,पण त्याची खात्री कुणालाही नाही. मतदारांचे बोलले गांभीर्याने न घेतल्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारून त्यांना सत्ता बाहेर काढण्याचे आवाहन केले.
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालतो का याचा विचार करणे गरजेचे आहे. भाजप पुढील पिढीचा मेंदू बंद करण्याचे प्रयत्न करत असून, वंचित समाजाने या कारस्थानाला बळी पडू नये. आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी सरकारवर मराठा-ओबीसी समाजात भांडण निर्माण करण्याचा आरोप केला.
भव्य मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राज्यातील नेते, प्रा.अंजली आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंचावर नतीकोद्दीन खतीब, अरुंधतीताई शिरसाट, राजेंद्र पातोळे, पी.जे वानखडे,भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याध्यक्ष यू.जी .बोराळे, अशोक सोनवणे, उत्कर्षाताई रूपवते, निलेश विश्वकर्मा, प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, श्रीकांत घोगरे, धीरज इंगळे, प्रदीप वानखडे, दामोदर जगताप, पुष्पाताई इंगळे, वंदनाताई वासनिक, भीमरावजी तायडे ,धैर्यवर्धन पुंडकर, ज्ञानेश्वर सुलताने , राहुल अहिरे, प्रशांत सिरसाट, रमेश गवळी, प्रभाताई शिरसाट, आम्रपाली खंडारे, सिंधुताई मेश्राम, सुनंदाताई तेलगोटे, गजानन गवळी, संजय गवई, राहुल गोटे, पंचशील गजघाटे, पराग गवई, प्रकाश बागडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार डोंगरे यांनी केले, प्रास्ताविक रमेश गवळी गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन विजय जाधव यांनी केले. यावेळी समता सैनिक दलाचे पथकाने मानवंदना दिली.
read also : https://ajinkyabharat.com/threatening-savatakhali-tirupati-skeptical-melmule-city-vigilance/