अकोट (प्रतिनिधी) – अकोट येथे प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली. बैठकीत कर्जमाफी संदर्भातील अकोल्या जिल्ह्यातील नियोजित दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून, वंदनीय बच्चुभाऊ कडू यांचा जिल्हा दौरा येत्या 19 तारखेला होणार आहे.
बैठक अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडली. यावेळी पक्ष निरीक्षक श्याम मसरे, जिल्हा संपर्कप्रमुख नितीन नागे, पाहुणे शहाणे सर, जिल्हाप्रमुख कुलदीप वसु, उपजिल्हाप्रमुख छोटू कराळे, युवक जिल्हाप्रमुख सुशील पुंडकर, अकोट तालुका अध्यक्ष गणेश गावंडे, अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष मोईन अली, अकोला पूर्व अध्यक्ष शाम वाघमारे, शेतकरी उपजिल्हाप्रमुख जीवन खवले, अकोट तालुका संघटक शुभम नारे, अकोट युवक अध्यक्ष अवी घायसुंदर, अकोट शहर अध्यक्ष गोलू भगत, युवक शहराध्यक्ष बल्ली राजा, अकोट दिव्यांग श्याम साबळे, ओम घोरड, छोटू पाटील, चौधरी शशांक गीते, अतुल गावंडे, सामी जमादार, सुशील तायडे यांसह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हाप्रमुख कुलदीप वसु यांनी केले, तर आभार प्रदर्शन शुभम नारे यांनी केले. बैठकीत पक्षाच्या आगामी योजना, जिल्हा दौऱ्याचे आयोजन व सदस्यांच्या कार्याची समीक्षा करण्यात आली.