अकोला – पोस्टे खदान पोलिसांनी घरफोडीच्या ११ घटनांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली
असून एकूण १४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२४ जून २०२५ रोजी यज्ञेश माहेन जोशी (वय ३२, रा. केशवनगर, अकोला) यांनी पोस्टे खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
ते काही कामासाठी बाहेर गेले असता, त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात व्यक्तींनी घराचे कुलूप तोडून ४७,२०० रुपयांचा ऐवज चोरी केला होता.
यावरून पोलिसांनी कलम ३११(४), ३०५ बि.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अहमद शेख उर्फ आरिफ
(वय ४६, रा. भगतवाडी गल्ली क्र. ३३, डाबकी रोड, अकोला) आणि तेजस कैलास खोब्रागडे (वय ३२, रा. गुना तारफाईल, लेबर कॉलनी, अकोला) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी पोस्टे खदान परिसरातील ११ घरफोड्यांचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून
सोने – ११३ ग्रॅम (किंमत ₹१०,१७,०००)
चांदी – २.९१० किलो (किंमत ₹२,६१,०००)
२ मोटारसायकल (किंमत ₹१,५०,०००)
इतर साहित्य ₹५००
असा एकूण १४,३२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी
शहर अधिक्षक मा. श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोहेकॉ अमित दुबे,
पोहेका निलेश खंडारे, पोका अभिमन्यू सदाशिव, पोको वैभव कस्तुरे यांच्या पथकाने केली.
Read Also : https://ajinkyabharat.com/kolvad-gavat-durudaii-incident/