पोपट बनला मोबाईलप्रेमी, सोशल मीडियावर व्हायरल झाला

मोबाईलप्रेमी पोपट व्हायरल

गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर गावात एक आगळावेगळा किस्सा समोर आला आहे. विजय रातपूत यांच्या घरातील पाळीव पोपटाला मोबाईलची सवय लागली असून, तो मोबाईलवर गाणं ऐकायला इतका व्यस्त राहतो की, इतर कोणालाही त्याला हात लावू देत नाही.

पोपट मोबाईल जवळून हलवण्याचा किंवा उचलण्याचा प्रयत्न केला, तर तो चावा मारतो. शिवाय, स्वतःच्या चोचीने टच करून मोबाईलवर गाणं सुरू करण्याचा प्रयत्नही करतो. या पोपटाचं मोबाईलप्रेम गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनलं आहे.

या पोपटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, लोक त्याचे विचित्र वागणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जमा होत आहेत. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, मोबाईलची सवय फक्त माणसांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर प्राण्यांनाही लागतेय का?

read also :https://ajinkyabharat.com/saj-brahmosne-pakistancham-morale-model/