पूनम पांडे साकारणार रावणाची पत्नी मंदोदरी, संतांचा कडाडून विरोध

पूनम पांडे मंदोदरी, संत संतप्त

दिल्ली – यंदा नवरात्र 21 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या लवकुश रामलीलामध्ये अभिनेत्री पूनम पांडे रावणाची पत्नी मंदोदरी म्हणून रंगमंचावर दिसणार आहे. मात्र, या घोषणेनंतर अयोध्येतील संत वर्ग संतप्त झाला आहे.संत दिवाकराचार्यजी महाराज यांनी म्हटले की, मंदोदरी हे पवित्र पात्र असून तिच्या पतिव्रतेत डाग लागला नाही. त्यामुळे तिची भूमिका साकारणारी व्यक्तीही पवित्र मन-शरीराची असली पाहिजे. त्यांनी पूनम पांडेवर अप्रत्यक्षपणे टीका करत “अशा लोकांनी केलेली रामलीला हिंदू समाज स्वीकारणार नाही” असा इशारा दिला.हनुमानगढीचे संत डॉ. देवेशाचार्य यांनीही पूनम पांडेविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी रामलीलेला समाजातील चारित्र्यनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरवताना म्हटले की, अश्लीलतेशी संबंधित व्यक्तीने मंदोदरीची भूमिका करणे दुर्दैवी आहे.दुसरीकडे लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुनकुमार यांनी सांगितले की, मंदोदरीची भूमिका पूनम पांडेला देण्यात आली कारण ती दमदार अभिनयासाठी सक्षम आहे. समितीने महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून, तिच्या भूमिकेत धर्मनिष्ठ नारीची भावना प्रकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.यंदाच्या रामलीलेत भगवान परशुरामाची भूमिका खासदार मनोज तिवारी, केवटाची भूमिका गायक शंकर साहनी, तर रावणाची भूमिका आर्य बब्बर साकारणार आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/chhagan-bhujbancha-motha-gaupyasti/