पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक

IAS पद

सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला

 एकीकडे यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर

आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला दणका दिला आहे.

Related News

सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला असून

तिला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणात आता अजून कोण-कोण गोत्यात येणार याची उत्सुकता आहे.

यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकरचे आयएएस पद काढून घेतलं असून

तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत

पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने

अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

तो न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-likely-to-be-bjps-ninth-president/

Related News