पूजा खेडकरचे वडिल विधानसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागणार

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध

लागले आहेत. राज्यात कुठल्याही क्षणी विधानसभेची

आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दररोज

Related News

विविध मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत.

आता वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी

सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी

शड्डू ठोकला आहे. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील

माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा

विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.

अहिल्यानगरच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ते

निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत दिलीप खेडकर यांनी सांगितलं की, लोकसभा

निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापितांना

त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असल्याचे वाटत आहे. त्यामुळे

वेगवेगळ्या पद्धतीने मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा

प्रयत्न झाला. त्यामुळे मला जरी राजकारणातून संपविण्याचा

प्रयत्न करण्यात आला असला तरी मी विधानसभेची निवडणूक

लढवणार असण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच, आगामी

विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी इच्छुक

असल्याचे दिलीप खेडकर यांनी म्हटले आहे. मात्र भाजपने जर

उमेदवारी दिली नाही तर इतरही पक्षाकडून आपल्याला ऑफर

मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता दिलीप खेडकर यांना

कुठल्या पक्षातून उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले

आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/election-commission-will-soon-reveal-the-election-date/

Related News