फुलचंद भगत
वाशिम:- सध्या मंगरुळपीर शहरात फटाके सायलेंसरमधुन फटाके फोडुन कानठळ्या बसवत काही बुलेटस्वार सुसाट झाले
अशा सैराट बुलेटस्वारावर कारवाईसाठी पोलिसांनी मोहिम तिव्र करावी अशी मागणी शहरवाशीयांमधुन होत आहे.
मंगरुळपीर शहरांमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून आवाज करणारे फटाके वाजवणाऱ्यांमुळे नागरीकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे.
अशांवर पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.
सैराट आणी फटाके फोडणार्या बुलेटचे सायलेन्सर जप्त करणे, दंड आकारणे किंवा इतर कायदेशीर कारवाईचा बडगा पोलिसांकडुन आवश्यक बनला आहे.
अनेक बुलेटस्वार त्यांच्या बाईकच्या सायलेन्सरमध्ये बदल करून तेथून फटाक्यांसारखा मोठा आवाज करतात, ज्यामुळे लोकांना त्रास होतो.
पोलिसांनी अशा बुलेटस्वारांवर कारवाई करण्यास सुरुवात होणे गरजेचे आहे.
गुरुवारी पोलिसांनी बुलेटस्वार आणि त्यांच्या गाड्यांची तपासणी करून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
अशा बुलेटस्वारांना नियम पाळण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
पण त्या सुचना अजुनही पायदळी तुडवल्या जात असल्याचे चिञ आहे.
पोलिसांनी सैराट बुलेटस्वारावर कारवाई केल्यास अशा कारवाईमुळे लोकांना होणारा त्रास कमी होईल,
अशी अपेक्षा नागरीकांकडुन व्यक्त केल्या जात आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर जि.वाशिम
मो.8459273206
