मुर्तीजापुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, आमदार पडळकर यांनी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कुटुंबाबद्दल खालच्या दर्जाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकशाही मूल्यांचा भंग होत असल्याचे नमूद केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राम कोरडे, अल्पसंख्याक उपाध्यक्ष निजाम इंजिनियर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम भाई घाणीवाला, युवक प्रदेश सचिव तेजस जामठे, तसेच मंगेश कुकडे, आनंद पवार, विशाल शिरभाते, सय्यद अलीम व मुदसिर छोटू मेकॅनिकल यांसह अनेक कार्यकर्ते तक्रारीच्या वेळी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने तक्रारीची नोंद घेऊन पुढील कारवाईची तयारी सुरू केली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/h-1b-whisone-change-changes/
