पोलीस ठाण्यात घडला भावनिक क्षण !

पोलीस

देवरी – “आम्ही सर्वांचे करतो… आमचे कोण करणार?” या भावना व्यक्त करत दहीहंडा पोलीस स्टेशनच्या वतीने कर्मचाऱ्यांनी आपल्या गणरायाचे विसर्जन अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात केले.सालाबादप्रमाणे अकोला जिल्ह्यात गणपती विसर्जन कार्यक्रम हा पोलीस प्रशासनासाठी एक मोठे आव्हान असते. अनेकदा विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, 2025 चा गणपती विसर्जन कार्यक्रम हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला.अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये गणेश विसर्जन शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाने निश्वास टाकला.विशेषतः दि. 9 सप्टेंबर रोजी, दहीहंडा पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला गणपतीही भक्तिभावाने विसर्जित केला. या प्रसंगी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजता ठाणेदार  ठाकरे यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत गणरायाला निरोप देण्यात आला.कर्मचारी वर्गाने पोलीस स्टेशनच्या आवारातच शेवटची आरती करत सर्व जनतेच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर गणरायाची मिरवणूक गावातून वाजतगाजत शांततेने पार पडली.गावकऱ्यांनी देखील या मिरवणुकीत सहभाग घेत गावातील एकोप्याचे दर्शन घडवले. या उत्साही कार्यक्रमामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.दहीहंडा पोलीस स्टेशनचा गणपती विसर्जन कार्यक्रम ठाणेदार  ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या पार पडला.

read also :    https://ajinkyabharat.com/tadkafdki-raazinama/