पातुर (प्रतिनिधी)-अकोला पोलीस दलाच्या वतीने मिशन उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक अकोला
मा. अर्चित चांडक साहेब यांच्या संकल्पनेतून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेचे शालेय व
महाविद्यालयीन गटात नुकतेच आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यामधून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला होता . या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून या स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक
विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर येथील वर्ग १२ वी विज्ञान मधील कु. आरती सुरेंद्र तायडे व कु.तृप्ती भैरवनाथ
खराट या दोन विद्यार्थिनींच्या पोस्टर ची पातुर तालुक्यातून निवड करण्यात आली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच
अकोला येथे संपन्न झाला असून यामध्ये कु. तृप्ती खरात व कु.आरती तायडे यांचा पोलीस अधीक्षक अकोला मा.श्री आर्चित चांडक
साहेब यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या विद्यार्थिनींनी काढलेले
पोस्टर पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे फ्रेम करून लावण्यात येणार आहेत ही अभिमानास्पद बाब आहे.
विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे संस्थेचे संस्थापक /सचिव मा. श्री रामसिंगजी जाधव साहेब
यांनी कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थिनींना पातुरचे ठाणेदार मा.हनमंत डोपेवाड (पोलिस निरीक्षक),मा.श्री.अभिषेक नवघरे
(पोलीस उपनिरीक्षक) महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.एम सौंदळे तसेच कलाशिक्षक श्री.चंद्रकांत वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kapus-kharedi-and-tidal-kharedi-scamychi-sit-chowkashi-honar/