पोलिस कारवाईने भक्तांचा रोष – मध्यरात्रीनंतर बाप्पाचे विसर्जन

गणेश विसर्जनात उशीर,

कामरगाव येथे यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीला अनपेक्षित वळण लागले. पोलिसांच्या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊन मिरवणूक रात्री सव्वा १२ वाजता संपली. गेल्या दशकात प्रथमच इतक्या उशिरा गणपती विसर्जन झाल्यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले.

८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रेम विलास गणेश उत्सव मंडळ, राम भरोसे गणेश उत्सव मंडळ, जय गजानन गणेश उत्सव मंडळ, जय विजय गणेश उत्सव मंडळ, वीर मराठा गणेश उत्सव मंडळ, अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ, जय भवानी गणेश उत्सव मंडळ, साईनाथ गणेश उत्सव मंडळ अशा ८ मंडळांनी सहभागी होऊन पारंपारिक वाद्ये, म्युझिकल बँड पार्टी आणि बहुरुपी अस्वलाच्या आकर्षक देखाव्यांनी मिरवणुकीचे सौंदर्य वाढवले.

संध्याकाळी साडे ९ पर्यंत मिरवणूक सुरळीत पार पडली. मात्र रात्री १० वाजता सर्व वाद्ये थांबवण्यात आली आणि विसर्जनासाठी मिरवणूक कापशी नदीकाठी पोहोचली. या दरम्यान पोलिसांनी म्युझिकल बँड पार्टीच्या गाड्या जप्त करून चौकीत नेल्या. संतप्त झालेल्या गणेश मंडळांनी “गाड्या सोडल्या जात नाही तोवर विसर्जन करणार नाही” असा पवित्रा घेतला. काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी गाड्या परत सोडल्या व विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र तोपर्यंत रात्री बारा वाजून गेले होते.

मध्यरात्रीनंतर आरती, ओवाळणी आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

गणेश भक्तांकडून पोलिसांवर आरोप करण्यात आला की, “अवैध धंदे पोलिसांच्या लक्ष्मी दर्शनाच्या धोरणामुळे चालू असतात, पण विसर्जनावेळी मात्र कायदा-सुव्यवस्था राखण्याचे भान अचानक का जागे होते?” भक्तांनी असा संताप व्यक्त केला.

यंदा विसर्जन प्रथा न थांबवता वेळेत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाने नियोजन अधिक प्रामाणिकपणे करावे, अशी जनतेची मागणी होत आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/congresswar-ethnicwacha-allegation-karat-devanand-pawar-yancha-rajinama/