ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई पाच आरोपी अटकेत

ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई पाच आरोपी अटकेत

माना फाटा क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेशातील एका मालवाहू वाहनामधून नऊ पशुधनासह एक बछडा दयनीय अवस्थेत पकडले गेले .

मालवाहू वाहनासह एकूण २६ लाख ४० हजार रुपयांचे पशुधन जप्त करण्यात आले .

ठाणेदार गणेश नावकर यांच्या नेतृत्वात अमरावती रोडवरील नाकाबंदीच्या दरम्यान उत्तर प्रदेशातील नोंदणी असलेले एक मालवाहन

तपासून उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली .

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी व डी. वाय. एस. पी. सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात केली गेली .

पशुधन क्रूरता निवारण अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत पुढील कार्यवाही सुरू आहे .

Read Also : https://ajinkyabharat.com/paavasabhvi-pike-kamakwat-shetkari-varun-rajachaya-pratik/