काव्यस्पर्धेचे निकाल जाहीर

अकोट-तेल्हारा काव्यस्पर्धा निकाल प्रसिद्ध"

अकोट:प्रतिभा साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य – अकोट तालुका कार्यकारिणीच्या वतीने आयोजित अकोट व तेल्हारा तालुकास्तरीय काव्यस्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी आलेल्या कविता वास्तवावर मार्मिक भाष्य करणाऱ्या आणि साहित्यिक दर्जा असलेल्या होत्या, असे परीक्षक समितीचे मत आहे.

स्पर्धेतून प्रथम क्रमांक कवी शंकर चोपडे, द्वितीय क्रमांक अंजली इंगळे, तर तृतीय क्रमांक रामदेव शिक्रे यांच्या कवितांना प्राप्त झाला आहे.
याशिवाय खालील चार कविंना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे:

चंद्रशेखर महाजन

अनंत गावंडे

उमेश थोरात

गोपाल भालतिलक

सर्व सहभागी कवींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

पुरस्कार समारंभाची माहिती

दिनांक: मंगळवार, २३ सप्टेंबर
वेळ: सायंकाळी ७ वाजता
स्थळ: वसुंधरा इंग्लिश हायस्कूल, अकोट

या पुरस्कार समारंभाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत:

श्री. हेमंतराव काळमेघ – शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य

ॲड. गजाननराव पुंडकर – उपाध्यक्ष

सुरेश दादा खोटरे – कार्यकारिणी सदस्य

भैय्यासाहेब मेटकर – भारत कृषक समाज संघटना अध्यक्ष

प्रशांतजी गावंडे – शेतकरी जागर मंच अध्यक्ष

विठ्ठलराव कुलट – संस्थापक अध्यक्ष, प्रसिद्ध कवी

अरुण काकड – जिल्हाध्यक्ष

हा कार्यक्रम साहित्यिक, रसिक व युवा कवींना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

ही माहिती संघाचे अकोट तालुका अध्यक्ष विशाल कुलट, सचिव सागर तळोकार, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे तसेच कार्यकारिणीने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

read also:https://ajinkyabharat.com/stimulation/