पीएम किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरित

पीएम किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरित

तर बुलढाणा येथे झालेल्या स्थानिक कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव झाले सहभागी

पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित झाला त्यानिमित्य

बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते.

त्यांनी शेतकऱ्यांसमावेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी येथे सुरू असलेले भाषण ऐकले त्यानंतर झालेल्या

कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुप्पमाला अर्पण केली.

यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शेतकरी हा देशाचा अन्नादाता आहे या अन्नदात्याला मदत

व्हावी या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजना कार्यान्वित केली.

ही योजना शेतकऱ्याप्रति असलेली खरी बांधिलकी आहे. पी एम किसान सन्मान योजना ही आर्थिक योजना

नाही तर देशातील अन्नदात्याच्या कष्टाचा हा सन्मान असल्याचेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.

पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत होते शेतीमध्ये लागणारे

बी बियाणासाठी या रकमेचा उपयोग होतो ही शेतकऱ्यांसाठी लाभदायी योजना असल्याचे ही त्यांनी सांगितलं.

याशिवाय केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविते त्या योजनांचा लाभ

शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी अस आवाहन यावेळी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी केले.

या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/chikhali-talukya-shetkari-suicide-session-suruch/