PM Kisan 21 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अपडेट: सरकारकडून नोटिफिकेशन, काही शेतकऱ्यांना पैसे थांबणार
केंद्र सरकारने PM Kisan सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 21 वा हप्ता कधी मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. फेब्रुवारी 2019 पासून सुरु झालेल्या या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 20 हप्त्यांद्वारे लाभ मिळाला आहे. एका हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जातात.वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑगस्ट रोजी 20 वा हप्ता जारी करण्यात आला, ज्यात 9 कोटी 71 लाख 41 हजार 402 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले गेले.
नवीन नोटिफिकेशन: काही शेतकऱ्यांना लाभ थांबवला जाईल
PM Kisan सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार काही संशयास्पद प्रकरणांमुळे काही शेतकऱ्यांना लाभ थांबवण्यात येणार आहे.
यामध्ये दोन मुख्य बाबी आढळल्या आहेत:
1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केलेले शेतकरी – हे शेतकरी योजनेच्या निकषांचे उल्लंघन करत आहेत.
एकाच कुटुंबातील एक पेक्षा अधिक शेतकरी लाभ घेणे – यात पती-पत्नी, 18 वर्षावरील सदस्य किंवा 18 वर्षांखालील मुलांचा समावेश आहे.
सध्या या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी होत नसल्यामुळे, त्यांचा लाभ थांबवण्यात येईल. शेतकऱ्यांनी PM Kisan वेबसाईटवरील “Know Your Status” या विभागात जाऊन आपली स्थिती तपासावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष 21 व्या हप्त्यावर
सध्याचे लक्ष आता PM Kisan 21 व्या हप्त्याच्या वितरणाच्या तारखेवर केंद्रित झाले आहे. सरकार आणि संबंधित विभाग लवकरच त्याची माहिती जाहीर करणार आहेत. शेतकऱ्यांनी आपले खाते तपासणे आणि आवश्यक असल्यास कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shetkayanasathi-guidance/