मुर्तीजापूर :स्वर्गीय रामदास भैय्या दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा येथे राष्ट्रतेज नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट शहराला हरित बनविण्याचा संकल्प करत प्रत्येक नागरिकामध्ये वृक्षारोपणाबाबत जागरूकता निर्माण करणे हे होते. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी सांगितले की,“प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे अत्यावश्यक आहे.” या कार्यक्रमात राष्ट्रतेज नवदुर्गा महोत्सव मंडळाचे राजेश कवटकर, अरुणभाऊ सवईकर, माजी सैनिक दिलीप सुरोसे, अर्पित अग्रवाल, प्रशांत देवगिरकर, शशिकांत बाळापुरे, श्याम देवगिरकर, नेहरू युवा मंडळ तालुका अध्यक्ष अनिल डाहेलकर, ईशाक सलमानी, रहमान शहा टेलर, संजय पातुर्डे, सनद दुबे, गजानन दुरतकर, तसेच स्वर्गीय रामदास भैय्या इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे, सहाय्यक शिक्षक विशाल अंबळकर, अर्चना मोरे, सेवक दीपक हांडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला शहरातील नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून अनेक वृक्षांची लागवड केली आणि त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. या कार्यक्रमातून शहर हरित आणि पर्यावरणपूरक ठेवण्याचा संदेश देण्यात आला.
read also:https://ajinkyabharat.com/pakistan-masti-ajun-utlali-naahi/
