पिस्ता खाणं ठरेल आरोग्यासाठी वरदान

डोळे, हृदय आणि त्वचेसाठी उपयुक्त पिस्ता

 जाणून घ्या फायदे:आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आहारात

अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करतो.

त्यात ड्रायफ्रुट्स हा आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता अशा ड्रायफ्रुट्समध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली

पोषक तत्वं मुबलक प्रमाणात आढळतात.

यामध्ये विशेषतः पिस्ता हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

पिस्त्याचे पोषक गुणधर्म

पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी6, प्रथिने, खनिजे, फायबर आणि

अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

हे घटक आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करतात.

त्याचबरोबर ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखी अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात.

आरोग्य फायदे

पिस्त्याचे सेवन केल्याने हृदयविकार, लठ्ठपणा, निद्रानाश आणि संधिवात

यांसारख्या समस्या टाळण्यास मदत होते.

गर्भवती महिलांसाठी पिस्ता फायदेशीर असून त्यातील

ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

यात भरपूर प्रमाणात प्रथिने असल्यामुळे

नवीन रक्तपेशींची निर्मिती व स्नायूंचा विकास होतो.

वजन कमी करण्यासाठी हे हेल्दी स्नॅक्स म्हणूनही सेवन करता येते.

सेवनाची योग्य पद्धत

तज्ञांच्या मते पिस्ता खाण्यापूर्वी तो पाण्यात भिजवून खावा.

पिस्त्याचा स्वभाव उष्ण असल्याने तो मर्यादित प्रमाणातच सेवन करावा.

तसेच मिठाई, पेस्ट्री किंवा इतर पदार्थांमध्ये मिक्स करून खाणे अधिक फायदेशीर ठरते.

read also:https://ajinkyabharat.com/aasiya-cup-teammadhyay-place-naahi-shamich-moth-state-statement-konalahi-dosha-nahi-sandhi-mali-tar-best-deen/